नंदुरबार हादरलं! दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन टाकीत फेकले, चार नराधमांना ठोकल्या बेड्या

नंदुरबार : एका रेल्वे कॉलनी परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार  करुन तिला गटाराच्या टाकीत फेकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन वर्षांच्या बालिकेवर नराधमांनी अत्याचार करुन तिचा गळा दाबून निर्घृणपणे हत्या केली, अशी माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर आली. त्यानंतर नंदुरबार पोलिसांनी या गंभीर घटनेची तातडीनं दखल घेतली आणि याप्रकरणी एका दाम्पत्यासह चार जणांना अटक केली. दरम्यान गुजरातमधून या मुलीचा मृतदेह आणला असल्याची माहिती उघड झाली आहे.
नंदुरबारचे पोलीस अधिक्षक पी आर पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, नंदुरबारच्या एका रेल्वे कॉलनी परिसरात दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. पीडित मुलीबाबत कोणतीही माहिती पोलिसांना मिळाली नसून अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे. याप्रकरणी अटक केलेले चार आरोपी भंगार गोळा करण्याचे काम करतात. पीडितेवर एकाहून अधिक व्यक्तीने शारिरीक अत्याचार केले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपींनी कोणत्या उद्देशाने हा निर्दयी प्रकार केला, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी, या क्रूर घटनेबाबत नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e