व्यापाऱ्यांची पैशांची बॅग खेचण्याचा प्रयत्न; झटापटीत गाडीवरुन पडून एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर जखमी

नाशिक-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) राज्य मार्गावर ॲक्सिस बँक जवळ दुचाकीवरून मागून आलेल्या चोरट्यांनी या कर्मचाऱ्यांकडील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. या ते दोन्ही कर्मचारी दुचाकीवरून खाली पडले आणि गंभीरित्या जखमी झाले.

नाशिक : छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) राज्य मार्गावर येवला शहराजवळ दुचाकीवरुन चाललेल्या व्यापाऱ्यांच्या हातातील पैशांची बॅग  खेचली. या झटापटीत दुचाकीवरील दोघेही व्यापारी  गाडीवरुन पडल्याने एका व्यापाऱ्याचा मृत्यू  झाला तर दुसरा व्यापारी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत बैशाची बॅग मात्र चोरट्यांना मिळाली नाही. विजय देशमुख असे मयत कर्मचाऱ्याचे नाव आहे तर राहुल उगले असे जखमी कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

बँकेतून पैसे काढून दुचाकीवरुन चालले होते दोघे व्यापारी

येवला तालुक्यातील अंदरसुल येथील कांदा व्यापाऱ्याचे कर्मचारी विजय देशमुख व राहुल उगले हे येवला शहरातील बँकेतून 7 लाख रुपयांची रक्कम काढून अंदरसुलकडे दुचाकीवर जात होते. शेतकऱ्यांचे कांद्यांचे पेमेंट करण्यासाठी हे पैसे त्यांनी बँकेतून काढले होते. नाशिक-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) राज्य मार्गावर ॲक्सिस बँक जवळ दुचाकीवरून मागून आलेल्या चोरट्यांनी या कर्मचाऱ्यांकडील पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. या ते दोन्ही कर्मचारी दुचाकीवरून खाली पडले आणि गंभीरित्या जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यात विजय देशमुख या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून राहुल उगले हा कर्मचारी गंभीररित्या जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चोरट्यांच्या हाती पैशाची बॅग न लागल्याने व कर्मचारी गाडीवरून खाली पडल्याचे बघताच चोरट्यांनी तेथून धूम ठोकली. 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e