जळगावात खळबळ; पोलीस साध्या वेशात वाहनधारक बनून गेले, टोल नाक्यावर बोगस पावत्यांचा पर्दाफाश

जळगाव : शहरातील आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी महामार्गावरील नशीराबाद टोलनाक्यावर वाहनधाकांना बनावट पावत्या देण्यात येवून शासनाची फसवणूक केली जात असल्याची तक्रार पोलीस विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्या विशेष पथकाने गुरुवारी टोलनाक्यावर कारवाई केली आहे. साध्या वेशात पोलीस वाहनधारक बनून गेले. टोल नाक्यावर पैसे दिल्यावर पथकातील कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या पावत्या बनावट होत्या. त्यानंतर पथकाने थेट छापा टाकून ही कारवाई केली. दरम्यान, या कारवाईने जिल्ह्याच एकच खळबळ उडाली आहे. 
जळगाव ते भुसावळ दरम्यान महामार्गावर असलेल्या नशिराबाद येथील टोल नाक्यावर बोगस पावत्यांच्या माध्यमातून गैरप्रकार सुरु असल्याची तक्रार आरटीआय कार्यकर्ता दीपककुमार गुप्ता यांनी पोलीस विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी त्यांच्या विशेष पथकाला तक्रारीची  तसेच कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.पडताळणी
पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरिक्षक राहुला फुला, पोलीस उपनिरिक्षक सुनिल चोधरी, हेडकॉन्स्टेबल प्रविण पाटील, सचिन विसपुते, पोलीस शिपाई अजमल बागवान, भारत डोखे, आसिफ तडवी यांच्या पथक गुरुवारी कारवाईसाठी टोलनाक्यावर पोहचले. कारवाईबाबत अंत्यत गोपनीयता ठेवण्यात आली होती. कारवाईबाबतची कुणालाही कानोकान खबर न लागता साध्या वेशात पोलीस अधीक्षकांचे पथक वाहनधारक बनून टोलनाक्यावर धडकले.
पथकातील कर्मचाऱ्याने टोल भरण्यासाठी पैसे दिले. त्यानंतर त्यांना पावती देण्यात आली. मात्र ही पावती बोगस असल्याची खात्री झाल्यावर पावती देणाऱ्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांना पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईत पोलिसांनी दोन मशीन जप्त केले असून टोलनाक्यावरील मॅनेजरसह पाच ते सहा जणांना ताब्यात घेतले आहे. शेवटचे वृत्त हाती आले तोपर्यंत याप्रकरणी पंचनामा करुन नशीराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e