शिवकुमार शिंदे हे सोमवारी सकाळी दूध घेवून मोटारसायकलवरून घरी निघाले होते. मंत्री कॉलनी ते हनुमाननगर रस्त्या दरम्यान संशयितासह त्याचे साथीदार दबा धरून बसले होते. त्यांनी शिवकुमार यांची मोटारसायकल अडविली. लोखंडी रॉडने त्यांच्या हातावर, पायावर, पाठीत मारहाण केली. या मारहाणीत शिवकुमार यांच्या पायाला, हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर सांगली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी मंगळवारी तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. अन्य संशयितांचा शोध सुरू असल्याचे तपास अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल जाधव यांनी साम टीव्हीशी बाेलताना सांगितले.
0 Comments