विसापूरच्या डबल मर्डर प्रकरणी साता-याच्या शनिवार पेठ, क-हाडच्या पार्लेतील युवकांना अटक

सातारा : सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विसापूर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हत्या प्रकरणी पाेलिसांनी दाेघांना अटक  केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून खटाव तालुक्यातील विसापूरच्या वृद्ध पती-पत्नीची हत्या काेणी केली असेल याचा उलगडा हाेत नव्हता. 
सातारा पाेलिस दलाने या घटनेचा कसून तपास करुन सतीश शेवाळे (खून झालेल्यांचा नातेवाईक) आणि त्याचा मित्र सखाराम आनंद मदने (पार्ले, कराड) यास अटक केल्याची माहिती एसपी अजयकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली. बन्सल म्हणाले सोन्याच्या हव्यासापोटी हा खून केला गेला असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. वृद्ध दांपत्याचा खून हा त्यांच्या नातेवाईकांनीच केला आहे.

आमच्यासाठी हा गुन्हा उघडकीस करणे हे माेठं आव्हान हाेते. या दाेन्ही आराेपींचे काेणत्याही स्वरुपाचे गुन्हेगारी रेकाॅर्ड नाही असेही एसपी बन्सल यांनी नमूद केले. ते म्हणाले शेवाळे हा साता-यातील शनिवार पेठेतील रहिवासी आहे. ताे संबंधितांचा नातेवाईक आहे. हा तपास करताना आम्हांला कल्पना हाेती की यामध्ये नवीन काेणी नसणार संबंधित ज्येष्ठांच्या परिचयाचा असणार आणि आमचा अंदाज खरा ठरला.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e