मुलीचे सहलीला गेल्याचे फोटो चुकीचे संदर्भ देऊन सोशल मीडियावर वायरल केल्याचा संतापातून महिलेने नगरसेविका पुत्रास चोप दिल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मध्ये घडली आहे. आज मुक्ताईनगर येथे नगराध्यक्ष पदाची निवड होती, मात्र न्यायालयाच्या निर्देशांवरून ही निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चा रंगल्या आहेत. त्यातच खडसे समर्थक नगरसेविका पुत्रास ही मारहाण झाल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मुलीची आई खूप संतापली होती. यावेळी त्यांनी सरळ सरळ त्या मुलाला मी अजून मारिन असेही म्हटले. याच बरोबर खडसे समर्थक नागरसेविकेचा मुलगा असल्याने याला लाज वाटली पाहिजे असे त्या म्हणाल्या. विकसित तंत्रज्ञानामुळे जागोजागी व्हिडियो व्हायरल होण्याचे प्रमाण वाढले आहे. यातच काही बहाद्दर नेहेमीच याचा फायदा घेतात आणि समोरच्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात. असाच प्रकार मुक्ताईनगर येथे घडला आहे. मुलीचा व्हिडियो व्हायरल झाल्याने परिसरात संतापाची लाट पसरली आहे.
0 Comments