लाचखोर तलाठी महिलेला तीन वर्षांची शिक्षा

सोलापूर : शेतजमिनीच्या वाटपपत्रांची नोंद लावून ७/१२ व ८ अ उतारा देण्याकरिता ५०० रुपयाची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या, तलाठी महिलेला विशेष न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांनी तीन वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. दोन हजाराचा दंड केला, तो न भरल्यास दोन महिन्याची साधी कैद सुनावली.
छाया बिराजदार (वय २८ रा. शिवालय, ६५ सी. स्वामी विवेकानंद नगर, हत्तुरे वस्ती, मजरेवाडी) असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव आहे. तक्रारदार अनिल उद्धव माने (वय ५४ रा. कौठाळी, ता उत्तर सोलापूर) यांनी गट नं. ४६८ या शेतजमिनीचे वाटपपत्रांची नोंद लावून ७/१२ व ८ अ उतारा देण्याकरिता अर्ज केला होता. त्यासाठी छाया बिराजदार यांनी ५०० रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. त्यावर अनिल माने यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली होती

दि. २२ जुलै रोजी दुपारी १२.४५ वाजता उत्तर सोलापूर मधील तहसीलदार यांच्या दक्षिण बाजूस असलेल्या कार्यालयात ५०० रूपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. सरकारी पक्षातर्फे केलेला युक्तिवाद ग्रा धरून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ अन्वये दोषी धरून दोन वर्ष सक्तमजुरी व एक हजाराच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा सुनावली.भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम१३अन्वये दोषी धरून आरोपीस तीन वर्षाची शीक्षा व दोन हजारांचा दंड सुनावला.दंड न भरल्यास आरोपीस तीन महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

या प्रकरणी सरकारतर्फे सहायक सरकारी वकील अ‍ॅड प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले. तपास पोलिस निरीक्षक शंकर साळुंखे यांनी तर कोर्ट पैरवी म्हणून एस.व्ही. कोळी, श्रीराम घुगे यांनी काम पाहिले. छाया बिराजदार यांनी शासकीय सेवेत असताना, पदाचा गैरवापर करून लाचेची मागणी केली. लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले ही बाब साक्षी पुराव्यावरुन सिद्ध झाली आहे असा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. प्रकाश जन्नू यांनी केला. खटल्यात एकूण चार साक्षीदार तपासण्यात आले, त्यामध्ये तक्रारदार अनिल उद्धव माने, पंच श्रीकांत यादव, तपासी अंमलदार शंकर साळुंखे व सक्षम अधिकारी शहाजी पवार यांची साक्ष महत्त्वाची ठरली.



Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e