आदिवासी विद्यार्थ्यांनी उंचावली नंदुरबारची मान; जिल्ह्यातील दोघांची अधिकारी पदावर वर्णी

नंदुरबार : नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील दोन आदिवासी विद्यार्थ्यांनी गगनभरारी घेतली आहे. आदिवासी  समाजातून येणाऱ्या दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाने नंदुरबारकरांची मान उंचावली आहे. त्यांच्या यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे. राहुल भूपेंद्र वसावे आणि ज्योती सुरेश कोकणी अशी दोघांची नावे आहेत. 
नवापूर तालुक्यातील वावडी गावचे रहिवासी राहुल भूपेंद्र वसावे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फेत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर नायब तहसीलदार पदी नियुक्ती झाली. त्यांच्या यशाची माहिती मिळाल्यावर नवापूर तालुक्याचे माजी मंत्री सुरुपसिंग नाईक व आमदार शिरीषकुमारजी नाईक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर नवापूर तालुक्यातील आमलाण गावाची रहिवासी कुमारी ज्योती सुरेश कोकणी ही पोलीस निरीक्षक या पदाची परीक्षा पास होऊन महाराष्ट्र पोलीस अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण पूर्ण करून पोलीस उपनिरीक्षकपदी नियुक्ती मिळाली आहे. त्यानंतर ज्योती सुरेश कोकणी या विद्यार्थिनीवर सर्व मित्र परिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. तसेच तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, प्रशिक्षणानंतर ज्योती कोकणी प्रथमच गावात आल्यानंतर तिचे नातेवाईक व गावकऱ्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. ज्योती सुरेश कोकणी ही नवापूर तालुक्यातील आमलाण गावातील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी. आपल्या शिक्षणानंतर मेहनतीच्या जोरावर पोलीस निरीक्षकपदी मजल मारल्याने कौतुक केले जात आहे. महाराष्ट्र पोलीस अकादमीच्या माध्यमातून पीएसआय पदाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आमलाण गावातील परिवार व नातेवाईकांनी कुमारी ज्योती सुरेश कोकणी हीचे जोरदार स्वागत करत अभिनंदन केले. यावेळी आमलाण गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आपल्या गावातील सामान्य कुटुंबातील मुलगी पीएसआय झाल्याचा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

तसेच नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाल्यावर राहुल वसावे म्हणाले की, मी नवापूर तालुक्यातील वावडी ग्रामीण भागातील सामान्य आदिवासी कुंटुबातील आहे. माझे प्राथमिक शिक्षण शासकीय आश्रम शाळा बंधारे येथे व माध्यमिक शिक्षण अनुदानीत आश्रम शाळा नवागाव येथे झाले आहे. तर राहुरी कृषी विद्यापीठ अंतर्गत कृषी महाविद्यालय पुणे येथून 'बी एस सी अ‌ॅग्री' पदवीचे शिक्षण झाल्यानंतर अधिकारी होण्याची जिद्द बाळगून अभ्यासाला सुरुवात केली. त्यानंतर दुस-या प्रयत्नात 'एमपीएससी'ची परीक्षा पास होऊन नायब तहसीलदारपदी निवड झाली आहे.

यावेळी नायब तहसीलदार राहुल वसावे यांनी आदिवासी सामान्य कुटुंबातील शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना अधिकारी बनण्यासाठी आवाहन केले आहे. माझ्यासारखे आपणही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करुन अधिकारी होण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन जिद्द व सातत्य टिकवून चिकाटीने अभ्यास करावा, असे सांगितले. राहुल यांचे वडील भुपेंद्र वसावे यांनीही आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, माझ्या मुलाप्रमाणे इतर पालकांनी देखील आपल्या मुलांना प्रोत्साहन देऊन उच्चशिक्षण देऊन मोठा अधिकारी करण्यासाठी प्रयत्न करावे'.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e