कृष्णा औचरमल आणि मिलिंद नागराळे अशी पाेलिसांनी अटक केलेल्या संशयित चाेरट्यांची नावे आहेत मोटारसायकल चोरांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या सहा मोटारसायकल जप्त करण्यात आल्या आहेत अशी माहिती किशोर पवार (पोलीस निरीक्षक, पैठण) यांनी दिली.
पोलीस निरीक्षक किशोर पवार म्हणाले पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली आहे. आम्ही दुचाकी चोरीची सुपारी घेत असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे. दुचाकी चोरून टोळीप्रमुखाला नेऊन द्यायची, त्यांनतर ठरलेली रक्कम घेऊन यायची असा हा सर्व चोरीचा खेळ सुरु असल्याचं तपासात समोर आले आहे.
सगळ्या गाड्यांचे दर ठरवून घायचे, त्यानुसार गाडी चोरून आणून द्यायची आणि आपले पैसे घेऊन मोकळे व्हायचे. त्यामुळे बाकी सर्व भानगडीत न पडता सुपारी घेऊन दुचाकी चोरण्याचा नवीन फंडा पाहून पोलीस सुद्धा चक्रावले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही संशयित आरोपींवर यापूर्वी देखील गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने संशयितांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
0 Comments