धुळे येथील पुराचा बळी चार दिवसानंतर सापडला ग्रामस्थाचा मृतदेह

धुळे : साक्री तालुक्यात झालेल्‍या मुसळधार पावसात नदी, नाल्‍यांना पुर आला होता. यात घोडदे गावातील युवक वाहून गेला होता. त्‍याचा शोध सुरू होता. दरम्‍यान चार दिवसापासून वाहून गेलेल्‍या युवकाचा मृतदेह आज सापडला
साक्री तालुक्यात गेल्या काही दिवसांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस  झाल्यामुळे परिसरात जलमय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यादरम्यान सर्वच नदी नाले हे तुडुंब भरून वाहत असताना घोडदे गावातील मासे पकडण्यासाठी गेलेला 45 वर्षीय इसम नदीला अचानक आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना घडली होती. जवळपास चार दिवसानंतर या इसमाचा मृतदेह पुराचा जोर कमी झाल्यानंतर घोडदे पुलाखाली आढळून आला आहे. दादाजी शिवबत पगारे (वय ४५) असे या इसमाचे नाव आहे,

जिल्‍ह्यातील पुराचा पहिला बळी

संबंधित इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरातील नागरिकांनी तात्काळ धाव घेत त्याचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. संबंधिताच्या नातेवाईकांना अमृता देह परिसरातील नागरिकांनी सोपविला आहे. यंदाच्या हंगामातील पावसामुळे पहिली मृत्यूची घटना उघडकीस आली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e