धक्कादायक! भावाचा ११ महिन्यांपूर्वी अपघाती मृत्यू; विधवा वहिनीसोबत दीराचं भयंकर कृत्य

गाझियाबाद : उत्तरप्रदेशच्या  गाझियाबाद शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली. येथे एका दीराने आपल्याच विधवा वहिनीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार करत तिची हत्या  केली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर तातडीने आरोपी दीरालाही अटक केली.

ट्विंकल (वय 23) असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेचा दीर आरोपी अभिषेक (वय 22) याला अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार,आरोपीचा मोठा भाऊ गौरव आणि 23 वर्षीय ट्विंकल यांचा विवाह सप्टेंबर 2017 मध्ये झाला होता. सुमारे 11 महिन्यांपूर्वी मुरादनगर येथे झालेल्या अपघातात गौरवला आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर ट्विंकल तिच्या तीन मुलांसह सासरच्या घरी राहत होती.

भावाच्या मृत्युनंतर आरोपी अभिषेक याची आपल्या विधवा वहिनीवर नजर होती. तो सातत्याने वहिनीवर नजर ठेऊन होता. इतकंच नाही तर, आपल्या विधवा वहिनीचे एका तरुणासोबत प्रेमसंबध असल्याचा संशय अभिषेकला होता. त्यातच त्याची वहिनी रात्री अनोळखी लोकांसोबत फोनवर गप्पा मारायची. त्यावरून तिचे आणि तिचा दीर अभिषेक यांच्यात नेहमी वाद व्हायचे 

कुटुंबातील इतर सदस्यांनी देखील मध्यस्थी करून दोघांचे अनेकवेळा वाद सोडवले. दरम्यान, सोमवारी रात्री आरोपी अभिषेक आणि त्याच्या वहिनीत फोनवरून बोलण्यावरून पुन्हा वाद झाला. तेव्हा कुटुंबीयांनी त्यांचा वाद सोडवला आणि त्यानंतर ट्विंकल ही तिच्या मुलांना घेऊन दुसऱ्या खोलीत झोपायला गेली.

मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास आरोपी अभिषेकला पुन्हा आपली वहिनी कुणासोबत फोनवर बोलत असल्याचा संशय आला. तेव्हा त्याने वहिनीच्या खोलीत प्रवेश केला आणि फोनवर बोलणाऱ्या वहिनीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने वार केला. या घटनेत ट्विंकलचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकून कुटुंबातील इतर सदस्यांनी ट्विंकलच्या खोलीकडे धाव घेतली. तेव्हा त्यांना ट्विंकलचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. यावेळी अभिषेकच्या हातात होता. कुटुंबीयांनी तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला. तसेच आरोपी दीर अभिषेकलाही अटक केली. पोलीस सध्या त्याची कसून चौकशी करत आहेत.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e