अफगाणिस्ताच्या सुफी धर्मगुरुची गोळ्या झाडून हत्या; पोलिसांनी केला मोठा खुलासा

नाशिक : नाशिकमध्ये  सुफी धर्मगुरूची हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. नाशिकच्या येवला येथील चिंचोली एमआयडीसी परिसरात अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरूची हत्या झाली. या हत्येचा प्रकरणात पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे.

अफगाणिस्तानी सुफी धर्मगुरू हे येवला येथे राहत होते. ३५ वर्षीय मुस्लिम धर्मगुरू अहमद चिस्ती यांची चार अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून हत्या केली. आरोपींनी हत्या करून घटनास्थळावरून फरार झाले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. या तपासात पोलिसांना मोठी माहिती हाती लागली आहे.

या मुस्लिम धर्मगुरूची त्यांच्या चालकाने हत्या केल्याचं पोलिस तपासात उघड झालं आहे. संपत्ती आणि पैशावरून मुस्लिम धर्मगुरू अहमद चिस्ती यांची हत्या झाल्याचं प्राथमिक माहितीत उघड झालं आहे. ही हत्येमागे आणखी काही कारण आहे का, याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे. 

अहमद चिस्ती असे मुस्लिम धर्मगुरूंचे नाव आहे. मात्र, विभागातील लोक त्यांना सुफी बाबा म्हणून ओळखायचे. गेल्या चार वर्षांपासून ते भारतात राहत होते. त्यांच्याबरोबर त्यांची पत्नी देखील राहत होती. केंद्र शासनाच्या परवानगीने रेफुजी म्हणून त्यांना भारतात राहण्याची परवानगी मिळाली होती. त्यांचं स्वत:चं यु-ट्यूब चॅनल होतं. त्या माध्यमातून ते धर्माबद्दलची माहिती द्यायचे. त्यांचे मोठ्या प्रमाणात फॉलोअर्स होते.

त्यामुळे यु-ट्यूबच्या माध्यमातून त्यांची मोठा प्रमाणात पैसा मिळत होता. त्यामुळे त्यांनी जमीन घ्यायची होती. मात्र,रेफूजी असल्याने त्यांच्या नावाने जमीन घेता येत नव्हती. त्यामुळे त्यांनी एका दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने जमीन घेतली. मात्र, या जमीनीवर त्यांच्यात वाद झाले. या वादातून सुफी धर्मगुरूची हत्या झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. अशी पोलिसांना प्राथमिक तपासात मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e