नंदुरबार : जिल्ह्यातल्या चांदसैली घाटात दरड कोसळुन रस्त्यात मोठ्या प्रमाणात माती साचत आहे. यामुळे वाहन धारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या मातीच्या चिखलामधुन जिवघेणी वाट सध्या प्रवाश्यांना काढावी लागत असुन दुसरीकडे प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे
मागच्या वर्षी याठिकाणी दरड कोसळल्याने रस्त्या बंद झाला होता. एका महिलेला उपचारासाठी खांद्यावर टाकुन दुसऱया बाजुला घेवुन जाव लागल होत. यात तिचा मृत्यु देखील झाला होता. मात्र प्रशासनाने याठिकाणी वर्षभरात कोणतीही उपयायोजना केली नसल्याचे दिसुन येत आहे.
बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष
मागील तीन ते चार दिवसांपासुन मातीचा ढिगारा रस्त्यावर पडुन देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्याची तसदी देखील घेतलेली नाही. या ठिकाणी चिखलात वाहन घसरुन पडत असल्याने प्रवाशी काहीसे किरकोळ जखमी देखील होत आहे.
0 Comments