पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली आहे.
गांजा तस्करी करणारा नवापूर शहरातील इस्लामपुरा भागात राहणारा 62 वर्षीय शेख गब्बान शेख अरमान याला ताब्यात घेतले असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर शहराच्या प्रवेशद्वारा जवळच शहरातील सर्वात मोठ्या महाविद्यालयाच्या गेटवरच चक्क गांजा विक्री होत असल्याने खळबळ उडाली आहे. सदरची कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जितेंद्र तोरवणे, जितेंद्र ठाकूर, तुषार पाटील, संजय रामोळे, आनंदा मराठे, दिनेश लाळकर आदींनी केली आहे.
0 Comments