अंगणवाडीचे पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात, तीन जण जखमी

मुंबई : नंदुरबार येथील शहादा येथून धडगावकडे निघालेल्या एका ट्रकला भीषण अपघात झाला आहे. अंगणवाडीचे पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने ट्रकचा अपघात झाला. या ट्रकमध्ये सहा जण प्रवास करीत होते. यापैकी  तीन जण या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींपैकी एक जण ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. अपघात झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची धडगाव पोलिसांनी  नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहादाहून धडगाव तालुक्यात अंगवाडीचे पोषण आहार घेऊन जाणाऱ्या ट्रकला भीषण अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. ट्रकचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्यावरुन ट्रक पलटी झाला.

या अपघातात तीन जण जखणी झाले असून स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. या अपघाताची माहिती मिळताच धडगाव पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांकडून या अपघाताबाबत तपास सुरु आहे. दरम्यान, धडगाव तालुक्यात पावसाची संततधार सुरु असल्याने ट्रक मधील पोषण आहार भिजल्याची प्राथमिक माहिती आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e