मन हेलावून टाकणारी घटना; विजेचा शॉक लागून चिमुकल्याचा दुर्दैवी अंत

नाशिक : नाशिकमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. नाशिकमध्ये उघड्यावरील विद्युत डीपीतील विद्युत प्रवाहाचा धक्का आठ वर्षांच्या लहान मुलाला बसला. या लहान मुलाचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. पुणे रोडवरील हॅप्पी होम कॉलनीत घडली आहे.या घटनेने उघड्यावरील विद्युत डीपींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. 
अरमान मुन्ना अन्सारी असे मृत मुलाचे नाव आहे. पुणे रोडवरील हॅप्पी होम कॉलनीत हा प्रकार घडला आहे. उघड्यावरील विद्युत डीपीतील विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान अरमानचा मृत्यू झाला. या घटनेने नाशिक परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर दोषींवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अरमान हा मित्रासोबत रविवारी शाळेला सुट्टी असल्याने खेळत होता. त्यावेळी त्याला विद्युत विभागांकडून लावण्यात आलेल्या डीपीच्या वायरचा शॉक अरमानला लागला. शॉक लागल्याने तो गंभीररित्या भाजला गेला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित लोकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना शनिवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. मुलाचा शॉक लागून मृत्यू झाल्याने शहरातील उघड्यावरील व धोकादायक विद्युत डीपींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी विद्युत डीपींना चौकट व भिंत बांधावी अशी मागणी केली आहे. या घटनेत दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच नाशिक शहरात असलेल्या विद्युत डीपी आठ दिवसात बंद न केल्यास आंदोलनाचा इशारा मराठा मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e