सारंगखेडा बॅरेजचे १५, प्रकाशा बॅरेजचे १७ दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

नंदुरबार : हतनूर धरणाचे सर्व गेट उघडले असल्‍याने तापी नदीत पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग होत आहे. यामुळे तापी नदीवरील  सारंगखेडा बॅरेज व प्रकाशा बॅरेजचे दरवाजे आज उघडण्यात आले आहेत.
हतनूर धरणाचे  ४१ गेट पूर्ण क्षमतेने उघडून एकुण १ लाख ४६ हजार २८ क्यूसेक्स इतका विसर्ग सोडण्यात आलेला आहे. संभाव्य पूर परिस्थिती लक्ष्यात घेता व पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे १५ द्वार पूर्ण क्षमतने उघडुन १ लाख १६ हजार २७९.१७ क्युसेक्स आणि प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे १७ द्वार पूर्ण क्षमतेने उघडुन १ लाख २४२.१५ क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात येत आहे 

गावांना सतर्कतेचा इशारा

तापी नदीत पाण्याचा येवा लक्षात घेता वरील प्रकल्पांतून विसर्ग वाढविण्यात येऊ शकतो. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीकाठांवरील गावांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e