सांगलीत गुटख्याचा मोठा साठा जप्त; कवठेमहांकाळ पोलिसांची धडक कारवाई

सांगली जिल्ह्यात गुटख्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. कवठेमहांकाळ पोलिसांनी कारवाई करत तब्बल ७ लाख ९३ हजार रुपयांचा गुटखा  जप्त केला आहे. यामध्ये एका आरोपीस ताब्यात घेण्यात आले असून याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. 
मिळालेल्या माहितीनुसार आज, रविवारी सकाळी स्कॉर्पिओ गाडीतून गुटख्याची वाहतूक होत असल्याची खबर कवठेमहांकाळ पोलिसांना मिळाली. पोलिसांनी कवठेमहांकाळ ते जत रोडवर नागोळे फाट्यावर सापळा लावला आणि ही चालकासह गाडीही ताब्यात घेत ही कारवाई करण्यात आली. यावेळी सुगंधी तंबाखू, गुटखा अशा एकूण २० पोती हस्तगत करण्यात आल्या आहेत. तसेच यासाठी वापरण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडीसुद्धा ताब्यात घेण्यात आली आहे. ताब्यात घेण्यात आलेला आरोपी हा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मलकापूर इथला असू निलकंठ बोरगे असे आरोपीचे नाव आहे. गुटख्याचा हा साठा कुठला आहे आणि कुठे जात होता याचा तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e