बीड अहमदनगर महामार्गावर एक दुर्देवी घटना घडली. महेन्द्रवाडीच्या घाटात, सामान घेऊन जाणारी ट्रक वळणावर रविवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पलटी झाला. या घटनेत ट्रकमधील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. निखील दहिफळे (वय 18) नानासाहेब सानप (वय 21) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत.
निखील आणि नानासाहेब हे दोघेही तरुण खडकवाडी ता. पाटोदा गावातील रहिवाशी होते. या घटनेने खडकवाडी गावात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीडच्या पाटोदा पोलिस ठाणे हद्दीत दौंडकडून येणारा ट्रक महेंन्द्रवाडीच्या घाटात आला असता, ट्रक चालकाला कॉर्नरचा अंदाज न आल्यामुळे, ट्रकवरील नियंत्रण सुटले
त्यानंतर ट्रक बाजूच्या दरीमध्ये कोसळला. या भीषण अपघातात ट्रक मधील निखील दहिफळे व नानासाहेब सानप यांचा जागीच मृत्यू झाला . दरम्यान हे मयत झालेले दोन्ही युवक अविवाहीत होते, त्यामुळं हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पाटोदा पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
0 Comments