जळगाव जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून दर आठवड्याला कुठे ना कुठे खून झाल्याची घटना कानावर येत आहे. दोन दिवसांपूर्वी गेंदालाल मिल परिसरात राहणाऱ्या तरुणाचा जळकी मिल रेल्वे ट्रॅकजवळ खून करण्यात आला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन तिघांना अटक करण्यात आली आहे.
शुक्रवारी रात्री ८.३० च्या सुमारास हरिविठ्ठल नगर परिसरातील गणपती मंदिर बाजार पट्टा परिसरात लोखंडी रॉडने दिनेश भोई याच्या डोक्यावर वार करण्यात आले. जखमी अवस्थेत त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार सुरू असताना रात्री ९.३० च्या सुमारास मृत्यू झाला.
घटनेची माहिती कळताच एलसीबीचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाव घेतली. संशयित विठ्ठल माऊली हटकर हा एका ठिकाणी लपला असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. एलसीबीचे विजय पाटील, प्रितम पाटील, सुधाकर अंभोरे, अक्रम शेख यांनी विठ्ठल हटकर याळ ताब्यात घेतले.
0 Comments