स्वस्तात सिमेंट घ्या, स्टिल घ्या; कोट्यावधी रुपयांचा गंडा घालणारा भामटा गजाआड

शिर्डी : कोपरगाव तालुक्यातील नागरिकांना कोट्यावधी रुपयांचा गंडा  घालणाऱ्या भामट्याच्या बेळगावच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. शिवानंद कुंभार असं  अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. स्वस्तात सिमेंट व स्टिल घ्या, स्टील सिमेंट नको असेल तर रोख रक्कम गुंतवा आणि काही महिन्यातच दुप्पट परतावा घ्या, असं आमिष कुंभारने नागरिकांना दाखवलं होतं. त्यानंतर नागरिकांनी गुंतवणूक केलेले पैसे घेवून कुंभार फरार झाला होता. मात्र, बेळगाव पोलिसांनी  या गंभीर प्रकाराची तातडीनं दखल घेवून आरोपी कुंभारवर कारवाई केलीय. दरम्यान, याप्रकरणी पुढील तपासासाठी कुंभारला कोपरगाव शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बाबासाहेब मच्छिंद्र गोसावी यांनी शिवानंद कुंभार यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार काही दिवसांपूर्वी दिली होती. त्यानुसार कोपरगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विरोधात ३ लाख २४ हजार रुपयांची फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल झाला.

आरोपी शिवानंद कुंभारला या प्रकरणातील तपासाठी बेळगाव पोलीसांकडून शनिवारी कोपरगाव पोलीसांनी ताब्यात घेवून कोपरगाव न्यायालयात हजर केले. आरोपीला न्यायालयाने ५ जुलै पर्यंत तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. शिवानंद कुंभार याच्यावर विविध ठिकाणी आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e