बनावट दारुचा कारखाना उद्‌ध्वस्त; सात जणांविरुद्ध गुन्हा

धुळे : शहरातील पांझरा नदीकाठी फुले नगरात सुरु असलेला बनावट दारुचा कारखाना शहर पोलिसांनी उद्‌ध्वस्त केला. त्यात एक लाख किमतीची दारु आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे 
बनावट दारुचा कारखाना चालविणाऱ्या पाच जणांसह ही दारु खरेदीसाठी आलेल्या  गुजरातच्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू केली आहे. शहरातील मोगलाई भागामधील पाटकिनारी फुलेनगरात पत्र्याचे छत असलेल्या घरात अवैध दारु कारखाना सुरु असल्याची माहिती शहर पोलिस  ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली. शहर पोलिस पथकाने रात्री पावणेअकराच्या सुमारास छापा टाकला. स्पिरीटचे ड्रम तसेच विदेशी दारुच्या भरलेल्या व रिकाम्या बाटल्या, बूच, सील, पिंप, गाळणी, बनावट मद्य निर्मिती कामी लागणारे साहित्य, असा एक लाख सात हजार ७३० किमतीचा मुद्देमाल घटनास्थळी जप्त केला. 
सात ताब्‍यात

अवैध दारु कारखाना चालविणारे नंदाबाई संजय केदार (वय ५५), वैशाली रवींद्र वाघमारे, (वय ३०), रवींद्र वाघमारे, विशाल केदार, सागर उर्फ दादू पिंपळे (सर्व रा. फुलेनगर) तसेच विदेशी बनावटीची दारु खरेदीसाठी आलेले प्रदीपकुमार विराभाई पटेल, अनिता प्रदीपकुमार पटेल (दोघे रा. सुरत, गुजरात) यांना ताब्यात घेण्याची कारवाई सुरू होती. पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपअधीक्षक ईश्‍वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहराचे निरीक्षक नितीन देशमुख, सहाय्यक अध्यक्ष संतोष तिगोटे, उपनिरीक्षक दीपक घनोटे, दत्तात्रय उजे, भिकाजी पाटील, हवालदार विलास भामरे, सतीष कोठावदे आदींच्या पथकाने ही कारवाई केली 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e