तिसगाव : करंजी तालुक्यातील पाथर्डी येथे धक्कादायक घटना घडली आहे. बोरुडे तलावात मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संदीप अकोलकर (२९) आणि बापू अकोलकर (२७) अशी मृतांची नावं आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाथर्डी येथे नेण्यात आले आहेत. दरम्यान, या दुर्देवी घटनेमुळं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संदीप आणि बापू हे दोघे सख्ख्ये भाऊ त्यांच्या शेतात असलेल्या तलावाजवळ मेंढ्या चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी त्यांना तलावाजवळ गेले असता संदीपचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला. त्यानंतर संदीपला वाचवण्यासाठी त्याचा भाऊ बापूने त्याला हात दिला. मात्र, दोघांचाही तोल गेल्याने ते पाण्यात पडले. पोहता येत नसल्याने या दोघा भावांचा तलावात बुडून मृत्यू झाला.
0 Comments