नवापूरमध्ये अधिरंजन यांच्या पुतळ्याला मारले चपला बुटे

नंदुरबार : राष्ट्रपत्नी असा अत्यंत संतापजनक उल्लेख करून काँग्रेस पक्षाचे सदनातील नेते अधीर रंजन चौधरी यांनी एकप्रकारे आदिवासींप्रती काँग्रेस पक्षात असलेली घृणा अधोरेखित केली आहे. देशाच्या सर्वोच्च संविधानिक पदावर बसलेल्या महामहीम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांचा असा अवमान करणारे अधीर रंजन चौधरी यांचा नंदुरबार जिल्हा भारतीय जनता पार्टीतर्फे निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
नवापूर शहरात तालुका अध्यक्ष भरत गावित यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपत्नी असा अपशब्द व असंवैधानिक भाषेचा वापर केल्यामुळे कॉंग्रेसचे खासदार अधीर रंजन चौधरी यांच्यावर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करत तिव्र जाहीर निषेध केला. तसेच खासदार अधीर रंजन यांच्‍या पुतळ्याला चपला बुटे मारून तिव्र संताप व्यक्त केला. त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी; असे निवेदन नवापूर तहसीलदार मंदार कुलकर्णी यांना देण्यात आले. यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष भरत गावीत, अल्पसंख्याक प्रदेश एजाज शेख, शहराध्यक्ष प्रणव सोनार, सरचिटणीस राजेंद्र गावीत, अजय गावीत, जयंती भाई अग्रवाल, सौरव भामरे, हेमंत जाधव, कुणाल दुसाणे, स्वप्नील मिस्त्री, रमलाभाई राणा, जितेंद्र अहिरे, दिनेश चौधरी, गोपी सेन, पवनकुमार दांडवेकर, निलेश प्रजापत, हेमंत शर्मा, तसेच भाजपचे महिला कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e