महाराष्ट्र ठेलारी महासंघाची इच्छामरणाची मागणी; प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष

धुळे : प्रशासनातर्फे मेंढपाळांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात दखल घेतली जात नसल्याचा आरोप लावत महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे इच्छा मरणाची मागणी करण्यात आली आहे.
2006 सालच्या ग्रेझिंग सेटलमेंटनुसार हजारो हेक्टर जमीन ही मेंढपाळांसाठी वनचराई म्हणून घोषित करण्यात आली आहे. परंतु प्रत्यक्षात या  वन जमिनीचा कुठल्याही प्रकारचा लाभ मेंढपाळांना मिळत नाही. दिवसेंदिवस मेंढपाळांवर अन्याय अत्याचार वाढत असल्याचे म्हणत प्रशासनातर्फे कुठल्याही प्रकारची दखल मेंढपाळांच्या संदर्भात घेतली जात नाही. असा आरोप लावत महाराष्ट्र ठेलारी महासंघाच्यावतीने आज जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाच्या माध्यमातून इच्छा मरणाची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाला दिले निवेदन

गावोगावी भटकंती करून उपजीविका करणाऱ्या मेंढपाळांकडे कागदपत्रकांची पूर्तता होणे कठीण असल्याने कागदपत्रांचे कारण पुढे देत प्रशासनातर्फे मेंढपाळांना वेठीस धरण्याचे काम करण्यात येत आहे. असे म्हणत संघटनेच्या वतीने इच्छामरणाची मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. प्रशासनातर्फे ठेलारी बांधवांना न्याय मिळत नसल्याने येत्या 15 ऑगस्टला ठेलारी बांधवांना इच्छा मरण मिळावे; यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन घोषणाबाजी करून जिल्हा प्रशासनाचा मेंढपाळांतर्फे निषेध करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e