दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी या घटनेत मृत्यू झालेल्या दोघांची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी कामठीच्या राणी तलाव मोक्षधाम इथे एका स्थानिक रहिवाशाच्या अपघाती मृत्यू झाला होता. सिद्धार्थ अंतुजी असं मृत व्यक्तीचं नाव आहे. त्यांच्या पार्थिवावर राणी तलाव
मोक्षधाम इथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते.
दरम्यान सरण पेटवत असताना डिझेलचा भडका उडाला. यामध्ये सुधीर महादेव डोंगरे, सुधाकर बुधाजी खोब्रागडे आणि दिलीप घनश्याम गजभिये हे तिघं गंभीर जखमी झाले. तिघांनाही भरपूर भाजलेलं होतं. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचादारम्यानच यातील दोघांचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एका आठवड्यापूर्वी नागपूरात दुसऱ्या एका घटनेत कोरोना (corona) काळात व्यवसायामध्ये मोठे नुकसान झाल्यामुळे एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची घटना समोर आली होती. या घटनेत व्यावसायिकाचा मृत्यू झाला होता. या घटनेत जखमी झालेल्या त्याच्या मुलाने आणि पत्नीनेही उपचारादरम्या अखेरचा श्वास घेतला होता. या घटनेनंतर आता पुन्हा एकदा नागपूरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे
0 Comments