मिळालेली माहिती अशी, नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर क्रमांक जी.जे.06 ए.झेड.3560 मध्ये विदेशी बनावटची रॉयल विस्की दारुची वाहतूक गुजरात राज्यात होत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस कॉन्स्टेबल दादाभाई मासुळे, राजेंद्र काटके, जितेंद्र ठाकूर तुषार पाटील, आनंदा पाटील, विसरवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी महामार्गावर सापळा रचून कंटेनर अडविला.
दरम्यान, तपासणीत कंटेनरमध्ये विदेशी बनावटची रॉयल विस्कीचे बाक्स आढळून आल्याने पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला आहे. विसरवाडी पोलीस ठाण्यात कारवाई केली आहे. या कारवाईत 43 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे. पर राज्यातून महाराष्ट्र मार्गे गुजरातमध्ये अवैध मद्यसाठा वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई केल्याने दारू तस्करांचे धाबे दणाणले आहे.
0 Comments