पंढरपुरातील विषबाधा प्रकरणी चौकशी करुन दोषींवर कारवाई करा; संजीव जाधव यांचे आदेश

पंढरपूर - येथील विठ्ठल आश्रमाततील वारकरी शिक्षण घेणाऱ्या 43 मुलांना अन्नातून विषबाधा झाली आहे. या विषबाधा प्रकरणाची सखोल चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याचे आदेश सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनी रात्री उशिरा दिले आहेत.

विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या 43 मुलांना दिनांक 17 जुलै 2022 रोजी अन्नातून विषबाधा झाल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयांत  उपचार घेत असलेल्या मुलांची आज अप्पर जिल्हाधिकारी 

विठ्ठल आश्रमात वारकरी शिक्षण घेणाऱ्या मुलांनी शेजारील मठात पंगत असल्याने जेवायला गेले होते. जेवणानंतर 43 मुलांना उलट्या, जुलाब व पोटदुखीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचे जाधव यांनी सांगितले.


Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e