वर्धा : बहिण-भावाचं नातं हे पवित्र बंधन असतं. रक्षाबंधन म्हणजे बहिण-भावाच्या प्रेमाचं बंधन असतं. माझा भाऊ नेहमीच माझं रक्षण करील, असा विश्वास प्रत्येक बहिणीचा भावावर असतो. पण वर्ध्यात नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका नराधम सख्ख्या भावाने बहिणीचं लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित अल्पवयीन मुलीचे पोट दुखत असल्याने तिला सेवाग्राम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी पीडित मुलगी सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले. नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेचा तीव्र निषेध केला जात आहे. ही धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील तक्रार दाखल केली. त्यानंतर शहर पोलीस ठाण्यातील पोक्सो विभागाने आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आई-वडिल कामानिमित्त घराबाहेर गेले असताना एका नराधम भावाने घरात असलेल्या बहिणीचे लैंगिक शोषण केले. बहिण-भावाच्या पवित्र नात्याला काळीमा फासण्याचं कृत्य नराधम भावाने केले आहे. पीडित मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
त्यावेळी ती गर्भवती असल्याचे उघड झाले. या घटना पीडितेच्या कुटुंबीयांना समजताच त्यांना मानसिक धक्का बसला. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. दरम्यान, सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासकांनी पीडित मुलीचे समुपदेशन केले. त्यानंतर घडलेला सर्व प्रकार पीडितेने पोलिसांना सांगितला. त्यानंतर आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले
0 Comments