गिरीश महाजन यांनी नंदुरबार जिल्ह्यातल्या अतिदुर्गम भागतील गोरजाबारी येथे जात त्याठिकाणच्या आदिवासी बांधवांसोबत दौपदी मुर्मू यांच्या राष्ट्रपती पदाच्या आनंदाचा जल्लोष साजरा केला; यानंतर ते पत्रकारांसोबत बोलत होते.
स्वतःचा ठसा उमटुन दाखवा
राज्यात शिवसेनेमध्ये सुरु असलेल्या सत्ता संघर्षात भाजपचा काहीही हात नाही. आपले अपयश लपवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेना भाजपच्या नावाने बाऊ करत असल्याची टिका माजी मंत्री भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे. भाजपचा राज्यासह देशात आपला ठसा उमटला आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील स्वतःचा ठसा उमटुन दाखवा; असे म्हणत मुंबई महानगरपालीकेचा घोडेबाजार समोर आहे. त्यांना पराभव दिसत असल्याने भाजपावर खापर फोडत असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले.
0 Comments