जळगाव (Jalgaon) जिल्हा परिषदेत (Jalgaon ZP) दहा गट वाढल्याने अनेक गटांमध्ये बदल झाला आहे. यानुसार भादली बु- कुसूंबा खु. या नव्याने रचना झालेल्या गटाचे भौगोलिक सीमांकन चुकीचे असल्याची हरकत लालचंद पाटील यांनी घेतली होती. याबाबत नाशिक विभागीय आयुक्तांकडे हरकत घेतली होती. मात्र, राजकीय दबावामुळे नाशिक विभागीय आयुक्तांनी सदरची हरकत फेटाळली. नवीन रचनेत जळगावची हद्द सोडून मोहाडी, सावखेडा गावांचे भौगोलिक सीमांकन करून चुकीचे गाव जोडली आहेत.
११ जुलैला सुनावणी
भादली बुद्रुक व कुसुंबा खुर्द जिल्हा परिषद गटाचे भौगोलिक सीमांकन राजकीय दबावापोटी चुकीचे केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी, नाशिक विभागीय आयुक्त, ग्रामविकास मंत्रालय महाराष्ट्र राज्य व निवडणूक आयुक्त यांच्या निर्णयाविरोधात माजी जि.प. उपाध्यक्ष लालचंद पाटील यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात खंडपीठात रिटपीटिशन याचिका दाखल केली आहे. त्यासंदर्भात ११ जुलैला सुनावणी होणार आहे.
0 Comments