नंदुरबारमध्‍ये काँग्रेसला खिंडार; अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

नंदुरबार : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मंगलसिंग वळवी यांनी विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे काँग्रेस पक्षात पोकळी निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.
सातपुडा अतिदुर्गम भागातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात तळागाळात शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी कार्य करणाऱ्या सामान्य आदिवासी कार्यकर्ता म्हणून ओळख असलेल्या आमश्या पाडवी यांना विधान परिषदेच्या माध्यमातून आमदारकी दिली. यामुळे पक्ष वाढीसाठी आणखी जोर लावला आहे. राज्यात शिवसेनेतील जवळपास निम्म्याहून अधिक आमदार वेगळा गट तयार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. आता शिवसेना पक्षाचे काय होईल याबद्दल वेगवेगळ्या प्रतिक्रिया असल्या तरी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या तालुक्यांमध्ये माजी आदिवासी मंत्री के. सी. पाडवी यांना धक्का देत विधान
 परिषद आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष वाढीसाठी बळ मिळत असल्याचे चित्र आहे. 
तालुका अध्‍यक्षासह प्रवेश

काँग्रेस पक्षाचे अक्कलकुवा तालुका अध्यक्ष मंगलसिंग वळवी यांच्यासह त्यांचे सुपुत्र सुरेश वळवी यांनी अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे काँग्रेस पक्षात खिंडार पडली आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व नवनिर्वाचित विधानपरिषदेचे आमदार आमश्या पाडवी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार आमश्या पाडवी यांनी अक्कलकुवा येथील शिवसेना संपर्क कार्यालयात शिवबंधन बांधुन शिवसेनेत प्रवेश दिला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e