मिळालेल्या माहितीनुसार मंठा तालुक्यातील गारटेकी फाट्यावर उभ्या बसमधून उतरून फटावर उभ्या असलेल्या तरुणाला लोणारकडून मंठा शहराकडे जाणाऱ्या कारने जोरदार धडक दिली. कार क्रमांक MH,14 -HY- 9911 चा चालक मधधुंद अवस्थेत भरधाव वेगात कार घेऊन जात असताना त्याचं कारवरील नियंत्रण सुटल्याने त्याने फटावर उभ्या असलेल्या तरुणाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, हा तरुण अक्षरशः दहा फूट रस्त्याच्या कडेला जाऊन पडला. या अपघातानंतर तरुण गंभीर जखमी झाला. तर मद्यधुंद कारचालक आपल्या कारसह रस्त्याच्या कडेला असलेल्या पाईपवर जोरदार धडकला. यात कारचालकही गंभीर जखमी झाला आहे.
0 Comments