नंदुरबार : राष्ट्रीय महामार्गावरील डी. जे. अग्रवाल इंग्लिश मीडियम शाळेजवळ खड्डे चुकवण्याच्या नादात वापी– धुळे बसने स्कूटरला धडक दिली. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर पती जखमी झाले आहेत.
कल्पनाबाई शरद पाटील (वय 33) असे मयत महिलेचे नाव आहे. ते धार्मिक कार्यक्रमासाठी नातेवाईकांच्या घरी मोटरसायकल (क्र. जीजे. १९, एआर ८६४४) दाम्पत्य आपल्या गावी जात होते. दरम्यान मागून येणारी साक्री डेपोची वापी- धुळे बस (क्र. एमएच. 20, बीएल 3425) चालकाने खड्डा चुकवण्याच्या नादात स्कूटरला जोरदार धडक दिली.
बसच्या मागच्या चाकात आल्याने मृत्यू
अपघातात स्कूटरवर मागच्या बाजूला बसलेली महिला बसचा मागच्या टायरमध्ये आल्याने जागीच ठार झाल्याचे दुर्दैवी घटना आहे. घटनास्थळी तात्काळ नवापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या पथकाने धाव घेत जखमींना मदत केली.
0 Comments