एलसीबीचा नवीन बारवर छापा; सहा महिला, चार बाऊन्सरसह २८ जणांवर गुन्हा दाखल

सोलापुरातील तुळजापूर  रोडवरील हगलूरमध्ये तीन दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या एका रेस्टॉरंट अँड बारवर पोलिसांनी  छापा टाकला. त्यानंतर पाेलिसांनी एकूण 28 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यातील काहींना अटक करण्यात आली आहे 
सोलापुरातील तुळजापूर रोडवरील हगलूरमध्ये तीन दिवसांपूर्वी संबंधित बार मालकाचा वाढदिवसाचा केक कापून या ठिकाणी ऑर्केस्ट्रा बार सुरू करण्यात आला होता. त्यांचा हा आनंद अद्याप ओसरला नसताना तिसऱ्या दिवशीच सोलापूर ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बारवर छापा टाकला.
या बारमध्ये अश्लिल नृत्य करणाऱ्या सहा महिला,चार बाऊन्सरसह २८ जणांवर पाेलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पाेलिसांनी डीजे म्युझिकल साउंड सिस्टम, लॅपटॉप, लाईट सिस्टीम, विदेशी दारूचे क्वार्टर आणि बिअरचा साठा, तसेच १५ दुचाकी जप्त केल्या आहेत. या सर्वांची किंमत सुमारे १४ लाख ४६ हजार ७२५ इतकी असल्याचे पाेलिसांनी सांगितलं.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e