ऑनलाईन बिल भरण्यासाठी अॅप डाऊनलोड केलं, महिलेला घातला दोन लाख रुपयांना गंडा

जालना : दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असून जालनामध्येही असाच प्रकार घडला आहे. तुमची लाईट कट होईल ,अॅनी डेस्क अॅप डाउनलोड करा, असा मॅसेज जालन्यातील अंकुशराव टोपे महाविद्यालयातील एका प्राध्यापक महिलेला आला होता. त्यानंतर त्या महिलेने अॅप डाऊनलोड केल्यानंतर एचडीएफसी बॅंकेच्या  खात्यातून दोन लाख रुपयांची फसवणूक झाली. या सर्व प्रकाराबाबत महिलेने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन पुढील तपास सायबर पोलिसांकडे वर्ग केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात सायबर क्राईमचे गुन्हे वाढले असून अंकुशराव टोपो महाविद्यालयातील एका प्राध्यापिकेला दोन लाखांना सायबर चोरट्यांनी गंडा घातला आहे. महिलेच्या मोबाईल क्रमांकावर महावितरण कंपनीच्या नावाने एक मॅसेज आला होता. तुमचं वीज बिल भरलं नसल्याने तुमचं कनेक्शन कट केलं जाईल. तुमचं कनेक्शन जर कट कराचे नसेल तर अॅनी डेस्क अॅप डाउनलोड करा, असं त्या मेसेजमध्ये लिहिलं होतं.

त्यानंतर महिलेने अॅप डाऊनलोड केले. पण सायबर चोरट्यांनी या अॅपद्वारे त्यांच्या एचडीएफसी बॅंक खात्यातील दोन लाख रुपये काढले. याप्रकरणी सदर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e