पावसाचा जोर कायम; महामार्ग सुरू होण्यास जास्त कालावधीची शक्यता

नंदुरबार : नवापूर तालुक्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील विसरवाडी गावाजवळ सरपणी नदीवरील पूल वाहून गेला आहे. यामुळ दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली आहे. पावसाचा जोर  कायम असल्याने पुराच्या पाण्यामुळे पूलाच्या दुरुस्तीसाठी जास्त कालावधी लागण्याची शक्यता दिसून येत आहे. वाहून गेलेल्या पुलाच्या ठिकाणी ठेकेदाराचे कोणतेही अधिकारी किंवा कर्मचारी दिसून येत नाही. 
महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या जे. एम. म्हात्रे कंपनीने पावसाळ्यापूर्वी सदर पूल बनविणे अपेक्षित होते. किंवा पर्यायी पूल चांगल्या दर्जाचा बनविणे गरजेचे असतानाही दुर्लक्ष करत काम केल्याने सामान्य नागरिकांसह वाहन चालकांची गैरसोय होत आहे.

शेतकरी, दूध विक्रेत्‍यांचे नुकसान

महामार्ग बंद झाल्याने दूध विक्रेते शेतकरी, छोटे मोठे व्यवसाय व वाहन चालक यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. प्रशासनाकडून पर्यायी मार्गावरून वाहतूक वळविण्यात आली असली तरी काल रात्रीपासून महामार्गावर अडकलेले वाहनचालक त्रस्त झाले आहेत.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e