आदिवासी भागातील शेंद्रीपाड्याला आदित्य ठाकरेंनी बांधून दिलेला पुल पाण्याखाली

नाशिक - जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. त्यामुळे आदिवासी भागातील शेंद्रीपाड्याला आदित्य ठाकरेंनी बांधून दिलेला पुल ही पाण्याखाली गेला आहे. खरशेतच्या तास नदीवरील बल्ल्यांवरून जीव धोक्यात घालून शेंद्री पाड्यावरील महिलांना पिण्यासाठी पाणी आणावे लागायचे. आदिवासी महिलांना 30 फूट खोल तास नदीवरील बल्ल्यांवरून रोज पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागत होती. त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे  यांनी मदतीची सूचना केली होती.
आदित्य ठाकरे यांच्या सुचनेमुळे अवघ्या दोन दिवसात नदीवर लोखंडी पूल उभारला गेला. मात्र आता संततधार पावसामुळे तास नदीला पूर आला आहे आणि हा पुल पुराच्या पाण्याखाली गेला आहे. पुराचा वेग इतका प्रचंड आहे की, पूल उखडून कधी जाईल हे सांगता येत नसल्याचे स्थानिक आदिवासी बांधव सांगत आहेत. आधी पुल नाही म्हणून जीव धोक्यात घालत नदी ओलांडणाऱ्या या आदिवासी महिलांसमोर आता पुलावर पाणी आल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच जर पाण्याच्या वेगाने जर पुल उखडूनच गेला तर पुन्हा तीच परिस्थीती उद्भवू नये यासाठी येथील आदिवासी बांधव प्रार्थना करत आहेत.

कादवा नदीला पूर, रवळस पिंपरी येथील पातळी पूल पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला

गेल्या दोन-तीन दिवसापासून मोठ्या प्रमाणात पालखेड धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस होत असल्याने कादवा नदीला पूर आला असून रवळस पिंपरी जवळील पातळी पूल पाण्याखाली गेल्याने निफाड सहकारी साखर कारखान्यावर जाणारा मार्ग बंद झाल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे

निफाड तालुक्यातील कादवा नदीला पालखेड धरणातून 20770 क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कादवा नदी पात्रात प्रचंड प्रमाणात पाण्याची आवक होतेय. त्यामुळे प्रशासनाने दखल घेत रवळस येथून निफाड सहकारी साखर कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गात बॅरिकेट टाकून प्रशासनाने सतर्कता म्हणून आधीच मार्ग बंद केला होता. दरम्यान पालखेड धरणाचे पाणी नदीपात्रात आल्याने पातळी पूल पाण्याखाली गेला आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e