बुलढाणा - मलकापुर तालुक्यालील वाघुळ येथिल मृतक ज्योती गजानन सनिसे वय २६ वर्ष हीने सासरकडील मंडळींनी दिलेल्या अमानवी त्रासापाई रात्रीच्या सुमारास नायलाॕन प्लास्टिकच्या दोरीने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे. मृतक ज्योती हीचा विवाह १९ मे २०१७ रोजी वाघुळ येथिल गजानन दशरथ सनिसे याचेशी झाला होता. लग्नात वधुपित्या कडुन भेटवस्तू दागीने व ४० हजार हुंड्यापायी दीले.नंतर या दोघांना २ मुली झाल्या पण नियतिला व कुटुंबीय क्रुर स्वभावाला हे पटले नसल्याने पतीसह सासरच्या इतर लोकांनी सततचे टोमणे मारत तुला मुलीच होतात तुला मुलगा होत नसल्याच्या अपमान जनक बोलणे तर पती गजानन सनिसे कडे नादुरुस्त क्रुझर गाडी असल्याने तिच्या दुरुस्तिसाठी माहेरवरुन ५० हजार आणण्याचा तगादा या त्रासाने कंटाळून आत्महत्या केली.
हा प्रकार आत्महत्या नसून घातपात असल्याचा संशय मृतकाच्या नातेवाईकाने केला आहे . मृतकाचा भाऊ सागर वानखेडे यांनी मलकापुर शहर पोलीस स्टेशनमध्ये घातपात असल्याचे तक्रार दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शवविच्छेदना नंतर वाघुड येथे पोलीस संरक्षणात अंतिमसंस्कार करण्यात आला तर या घटनेतील आरोपी पती गजानन व राजु यास अटक केली असुन व ५ जण फरार असल्याने पोलीस त्यांच्या मागावर आहेत.या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून मृतक ज्योतिला झालेल्या अत्याचारा बाबत न्याय मिळावा अशी मागणी मृतक नातेवाईकांनी केली आहे.
0 Comments