घाबरून पाठविले साडेदहा हजार रूपये
तक्रारदार यांनी घाबरून दिलेल्या बँक अकाऊंटवर १० हजार ५८० रूपये पाठविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदार यांनी (ता.१९) सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर पोलीसांनी तांत्रिक तपासात संशयित आरोपी हा हरियाणा येथील असल्याचे निष्पन्न झाले. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ. मिलींद जाधव, ललित नारखडे, संदीप नन्नवरे यांनी संशयित आरोपी मुरसलिम आशू मोहम्मद (रा. गागडबास मेवात, हरीयाणा) याला हरियानातून शुक्रवारी ८ जुलै रोजी अटक केली. याप्रकरणी रविवारी १० जुलै रोजी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून गुन्ह्यातील १० हजार ५८० रूपयांची रक्कम हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.
0 Comments