सुपाऱ्या कुणी घेतल्या? एकेकाचं नाव घेत वैभव नाईकांचा थेट नितेश राणेंवर हल्लाबोल

नारायण राणे यांनी जेव्हा शिवसेना सोडली. त्यावेळी त्यांना संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सुपारी दिली होती, असं ट्विट भाजपचे आमदार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटमुळं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात राजकीय संघर्ष पेटला असतानाच शिवसेनेचे आमदार वैभव नाईक  यांनी या वादात उडी घेतली आहे. सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. श्रीधर नाईक,सत्यविजय भिसे,अंकुश राणे,गोवेकर यांच्या हत्या कशा झाल्या, हे संपूर्ण राज्याला माहीत आहे, असा गंभीर आरोप करत नाईक यांनी नितेश राणेंसह  केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्यावर अप्रत्यक्षपणे केला आहे.
माध्यमांशी बोलताना नाईक म्हणाले, सुपाऱ्या घेऊन राजकीय हत्या कोणी केल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. उद्धव ठाकरेंवर आरोप करणाऱ्या नितेश राणेंचे शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात नाव आहे. शिंदे गट झाल्यामुळे नितेश राणेंची शिवसेनेवर टीका करण्याची सुपारी संपली आहे. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आपण चर्चेत यावं म्हणून नितेश राणे असे आरोप करीत आहेत.सुपारीबाज कोण आहेत, हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. सुपारीबाजांचा इतिहास योग्यवेळी सादर करू, असा इशारा वैभव नाईक यांनी नितेश राणेंना दिला आहे.
राज्याच्या राजकारणात बंडाचा झेंडा फडकावून एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेला जोरदार धक्का देत उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार केलं. त्यानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आणखीनच पेटला. महाराष्ट्रात वादळ उठवणाऱ्या एकनाथ शिंदे गटावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून हल्लाबोल करत आहेत. तर दुसरीकडे नारायण राणे यांचे पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणे यांनीही ट्विटरवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e