नागपुरातील धक्कादायक घटना; १२ वर्षाच्या मुलीवर नऊ जणांकडून सामूहिक बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १२ वर्षांची मुलीचे आई-वडिल शेतमजुर आहेत. आरोपी गजानन मुरस्कर (४०, उमरेड) हा मुलीच्या घराजवळच राहतो. त्याच्या घरी कुख्यात गुंड रोशन सदाशिव कारगावकर (२९, उमरेड) याचे नेहमी येणे-जाणे होते. रोशनची वाईट नजर मुलीवर पडली. १९ जूनला मुलीचे आई-वडिल गावी गेले होते. दुपारी रोशन कारगावरकर आणि गजानन मुरस्कर हे दोघे मुलीच्या घरी आले. त्यांनी मुलीला उचलून रोशनच्या घरी नेले. तेथे तिच्यावर प्रेमदास जागोबा गाठीबांधे (३८), गोविंदा गुलाब नटे (२२, रानबोरी, ता. कुही) आणि सौरव ऊर्फ करण उत्तम रिठे (२२, रानबोरी) यांनी बलात्कार केला, यामुळे ती मुलगी बेशुद्ध पडली.

ऊर्फ पिंकू निनायक नरुले (२४, रानबोरी) असे पाच जण दारू पित बसले होते. तिला दमदाटी करून पाचही जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. पहाटेच्या सुमारास त्या मुलीला रोशनने तिच्या घरी सोडले. तब्बल नऊ जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्यामुळे ती मुलगी आजारी पडली.

आरोपीने पोलीस कोठडीत असताना दिली गुन्ह्याची कबुली –

१५ जुलैला रोशनने गावातील मित्रांसोबत मुलीवर सामूहिक बलात्कार केला. रोशन हा तीन दिवसांपूर्वी घडलेल्या हत्याकांडातील आरोपी असून त्याने पोलीस कोठडीत असताना गुन्ह्याची कबुली दिली. या प्रकरणी उमरेड पोलिसांनी सामूहिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून ९ जणांना अटक केली असून या गुन्ह्यात आणखी आरोपी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e