मुख्याध्यापकासह शिक्षिकेने स्वीकारली 1,250 रुपयांची लाच, एसीबीकडून मालेगावच्या शाळेतच कारवाई

नाशिक : जिल्ह्यात लाच घेतानाच्या अनेक घटना उघडकीस येत आहेत. यामध्ये अनेक मोठमोठ्या अधिकाऱ्यांपासून ते शिपायांपर्यंत अनेकजण एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. आता मालेगाव शहारातून एसीबीच्या आणखी एक कारवाई समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील एका खासगी शाळेतील मुख्याध्यापकसह शिक्षिकेने 1,250 रुपयांची लाचेची मागणी करत लाच स्वीकारली. एसीबीने या दोघांना लाच घेताना रंगेहात पकडलं. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे
मालेगाव शहरातील सोयगाव परिसरातील जागृती माध्यमिक विद्यालयात ही घटना घडली आहे. या शाळेत शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला घरभाडे भत्ता लागू करण्यासाठी 1,250 रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापक राहुल मोराणकरसह शिक्षिकेला अटक झाली. बुधवारी दुपारी नाशिक विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने विद्यालयातच ही कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. 

दरम्यान, जागृती विद्यालयात शिपाई असलेल्या कर्मचाऱ्याला सोयगाव महानगरपालिकेत समाविष्ट झाल्याने पगारात वाढ होऊन घरभाडे भत्ता लागू करण्याचा प्रस्ताव होता. यासाठी मुख्याध्यापक मोराणकर व शिक्षिका चव्हाण यांनी 1,250 रुपयांची लाच मागितली. संबंधित शिपायाने याबाबत नाशिक लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. मोराणकर यांनी संबंधित शिक्षिकेला ही रक्कम घेण्यास सांगितले. मुख्याध्यापक कार्यालयातच रक्कम स्वीकारताना दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. या प्रकरणी दोघा संशियतांविरुध्द रात्री उशिरापर्यंत कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. 


शिक्षण व्यवस्थेतील 'लाच'पुराण
शिक्षक हा शिक्षण महत्वाचा घटक म्हणून ओळखला जातो. शिक्षकाच्या हातून हजारो विद्यार्थी घडत असतात. मात्र अलीकडच्या काळात शिक्षण व्यवस्थेत लाचपुराण समोर येत आहेत. नाशिकच्या शिक्षणाधिकारी असलेल्या महिला अधिकाऱ्याने आठ लाखांचे प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यानंतर छोट्या मोठ्या लाचेची अनेक प्रकरणे समोर आली. त्यातच ही मालेगाव येथील घटना ही त्याचेच उदाहरण आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e