जळगावात पोलिसांचा लॉजवर छापा, १३ जोडपी आक्षेपार्ह अवस्थेत; मुली म्हणाल्या, आम्ही तर...

जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरातील दोन लॉजिंगवर गुरुवारी पोलिसांनी छापा टाकला. या लॉजवर मुला मुलींची १३ जोडपी सापडली आहेत. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान लॉज मालक व दलालांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या कारवाईने जळगाव शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मात्र छापेमारी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलींनी आपण तर आपल्या मर्जीने इथे आलो, असा दावा केला आहे.
ताब्यातील मुलींमध्ये कॉलेजवयीन तरुणी

धाडसत्रात एका ठिकाणी तीन मुली व तीन मुले, तर दुसऱ्या ठिकाणी ९ मुली व ९ मुलं आढळून आली. यात काही मुली वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत तर काही मुली परप्रांतीय आहेत. त्या जळगावात स्थायिक झालेल्या आहेत.
स्वतःच्या मर्जीने आलो, मुलींचा दावा

एका ठिकाणी दलालाच्या माध्यमातून मुली पुरविण्यात आल्याचे उघड झाले आहे. आपण आपल्या मर्जीने आल्याचे या मुलींनी पोलिसांना सांगितले. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. शेवटचे वृत्त हाती आले, तोपर्यंत या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e