धडगाव येथे सागवान लाकडासह २ लाख ८२ हजाराचा मुद्देमाल जप्‍त

नंदुरबार : जंगलातून सागवान लाकडाची तस्‍करी होत असल्‍याची गुप्‍त माहिती मिळाली. या माहितीच्‍या आधारे केलेल्‍या कारवाईत धडगाव वन विभागाने  सागवान लाकडासह २ लाख ८२ हजार १६६ रूपयांचा मुद्देमाल जप्‍त केला आहे.
वन क्षेत्रपाल अक्राणी व रेंज स्टाफ यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून शैलकुई- राजबर्डी रस्त्यावर गस्त करत असतांना संशयित वाहन (क्र. एमएच 04, ईएल 8646) निदर्शनास आले. सदर वाहनास अटकाव केला असता वाहन चालक वाहन थांबून पसार झाला. सदर वाहनाची तपासणी केली असता यात साग चौपाट 92 नग 1.054 घनमीटरचे लाकून आढळून आले. 31 हजार 620 रुपये किंमतीची साग व बेलखेचे 15 नग 546 रूपये असा एकूण 32 हजार 166 रूपयाचा मुद्देमाल मिळून आला. सदर मुद्देमाल व अडीच लाख रुपये किंमतीच्‍या पीकपसह एकुण 2 लाख 82 हजार 166 रूपयाचा मुददेमाल जप्त करुन सदर वाहनासह धडगाव टिंबर डेपोत पावतीने जमा करून कारवाई करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही सदर कार्यवाही वनसंरक्षक दि. वा. पगार (धुळे), उपवनसंरक्षक लक्ष्मण पाटील (नंदुरबार वनविभाग शहादा), सहाय्यक वनसंरक्षक संजय साळुंखे (रोहयो) अक्राणी यांच्या मार्गदर्शनाखाली अक्राणी वनक्षेत्रपाल चारुशीला काटे, माकडकुंडचे वनपाल भरतसिंग परदेशी, वनरक्षक गुलाबसिंग तडवी (पिंपरी), वनरक्षक अनिल पाडवी (‍धडगाव) व वनरक्षक मांगा वळवी (अटटी) यांच्या पथकाने कारवाई केली आहे

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e