धुळे येथे आयुक्त दालनाच्या प्रवेशद्वारावर बांधली समस्यांची दहीहंडी; मनसेचे आंदोलन

धुळे : दहीहंडीचा उत्सव देशभरामध्ये मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. परंतु धुळ्यात मात्र मनसेच्यावतीने अनोख्या पद्धतीने दहीहंडी साजरी करण्यात आली आहे. धुळे शहरात असलेल्‍या समस्‍यांना हात घालत मनपा आयुक्‍त दालनाच्‍या प्रवेशद्वारावर समस्‍यांची दहीहंडी बांधून आंदोलन केले. 
धुळे शहरामध्ये महानगरपालिका  हद्दीमध्ये नागरिकांना खड्ड्यांचा त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याचा तसेच इतर बहुतांश अडचणींचा सामना रोजच करावा लागत आहे. यामुळे धुळे महापालिकेचा निषेध करण्यासाठी मनसेच्यावतीने बालकृष्णाच्या हस्ते महानगरपालिका आयुक्तांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर समस्यांची दहीहंडी उभारण्यात आली आहे.

आयुक्‍तांनी फोडावी हंडी

पालिका प्रशासनातर्फे आयुक्त साहेबांनी ही दहीहंडी लवकरच फोडावी व धुळेकरांना समस्या मुक्त करावे; अशी मागणी यावेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या समस्यांच्या दहीहंडीच्या माध्यमातून केली आहे.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e