बायकाेचा शाेध का घेत नाही असं म्हणत युवकानं केला पोलिसांवर हल्ला; न्यायालयीन काेठडीत रवानगी

तुम्ही माझ्या बायको आणि मुलाला शोधू शकत नाहीत तर तुम्ही काय कामाचे?' असे म्हणत युवकाने पोलीस ठाण्यातच कर्मचाऱ्यांवर कटरने वार करून मारहाण केल्याची घटना औरंगाबाद शहरात घडली. यामुळं पाेलिस ठाण्यात एकच खळबळ उडाली. ही घटना मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात घडली. प्रल्हाद किसान भंडारे या युवकाने हे कृत्य केलं. याप्रकरणी पाेलीस निरिक्षक ब्रम्हा गिरी यांच्या आदेशाने त्याच्या विरोधात सरकारी कामात अडथळ्यासह, मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला. प्रल्हाद भंडारे याने पत्नीचा पाेलिस शोध घेत नाहीत असा आराेप करुन पाेलिसांवर हल्ला केला. त्यास पाेलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात (court) हजर केले असता न्यायालयाने चाैदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e