धक्कादायक! नवस फेडण्याच्या बहाण्याने आले अन् दोन लाखाचे दागिने घेऊन पळाले

बार्शी : बार्शी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी नवस फेडण्याच्या बहाण्याने एका महिलेचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. गणपती मंदिरात माझ्या आजीने बोललेला नवस फेडायचा आहे, असे सांगून हातचलाखीने चार तोळ्याचे दागिने चोरट्यांनी चोरले. याप्रकरणी पोलिसांनी  आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. संगीता जाधव असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन अज्ञात इसमांनी आजीने बोललेला नवस फेडायचा आहे, गुप्तधन द्यायचं आहे, असं महिलेला सांगितलं. त्यानंतर सदर महिलेस दागिने देवापुढे ठेवण्यासाठी सांगितले. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला. याबाबत महिलेनं तक्रारीत म्हटलं की, दोघांपैकी एक जण सांगत होता, माझ्या आजीने नवस बोलला आहे.

तो नवस फेडण्यास गणपती मंदिरात आलो असून गुप्तधन देणार आहे. मला मंदिरामध्ये घेवून गेले. त्यावेळी सोन्याचे दागिने मंदिरात ठेवा असं त्यांनी सांगितलं. माझ्या हातातील अंगठी व तीन तोळ्याचे गंठण मी काढले. त्यानंतर दागिने देवासमोर ठेवले. पण संधीचा फायदा घेत ते दागिन्यांची पिशवी घेवून पसार झाले.

Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e