भांडण सोडवण्यासाठी गेली अन् जीव गमावून बसली; महिलेसोबत घडली भयावह घटना

नाशिक : कुणाचं भांडण सुरू असेल, तर अनेकदा आपण माणुसकीच्या नात्याने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यातच भांडणं तर गावातील असेल, तर अनेकजण मध्यस्थी करून भांडणे सोडवतात. मात्र, काही वेळा असं होतं की, भांडण सोडवताना समोरची व्यक्ती आपल्याच गळ्यात पडते. म्हणजेच काय तर ती आपल्यासोबतच भांडायला सुरूवात करते. नाशिकमधून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. इगतपुरीमध्ये भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला 

नेमकं काय घडलं?

जाकिया शेख असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, इगतपुरीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका मुलाचा आपल्या आईसोबत वाद सुरू होता. आई आणि मुलामध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं. ही गोष्ट जाकिया यांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांना समजावून सांगत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला 

मात्र चांगुलपण दाखवणं जाकिया यांच्या अंगलट आलं. जाकिया यांचीच यांचीच धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेचीच हत्या करण्यात आल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.



Post a Comment

0 Comments

https://www.videosprofitnetwork.com/watch.xml?key=e23209d764c415b949fb011496c1f26e