मिळालेल्या माहितीनुसार, निकेश या चिमुकल्याचा दोन दिवसांपूर्वी आजारपणामुळे मृत्यू झाल्याचं सांगत त्याच्या वडिलांनी रात्रीच्या अंधारात एका झोपडीच्या शेजारी निकेशचा मृतदेह खड्डा करून पुरला होता. काही नागरिकांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबतची माहिती विरार पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शनिवारी संध्याकाळी घटनास्थळी पोहोचून कुदळ आणि फावड्याने खड्डा करून पुरलेला मृतदेह बाहेर काढला.
हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने तो ताब्यात घेत शवविच्छेदन अहवालासाठी मुंबईच्या जेजे रुग्णालयात पाठवून देण्यात आला आहे.. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या चिमुकल्याचा मृत्यू हा आजारपणामुळे झाला असल्याची माहिती त्याच्या वडिलांकडून मिळत आहे. मात्र या चिमुकल्याचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याची हत्या तर करण्यात आली नाही ना? याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.
0 Comments